मुंबई : विरोधक ५० हजार कोटीचं पॅकजची मागणी करत आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहिर केलं त्यातील केऴल २ लाख कोटी रुपये केंद्रांच्या बजेटमधून आले. जर केंद्र सरकारने २ लाख कोटीचचं पॅकेज देतं तर ५० हजार कोटीचं पॅकेज कशाच्या आधारावर मागतात. काहीही मागायचं? केंद्राने आम्हाला काय दिला असा टोला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या मोदींच्या चुकांवर आम्ही टीका करत नाही. त्यांनी सांगितले थाळ्या वाजवा, दिवे लावा आम्ही लावले. संकटाच्या काळात आम्ही देशाच्या प्रमुखांच्या पाठीशी आहोत, एकसंध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता
. पण राज्यात मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी विरोधक राजकारण करत असून आंदोलन करणार आहेत, असं जयतं पाटील यांनी सांगितले. 


कोरोनाचं संकट मोठं आहे. अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरू आहे. बेडची सुविधा देखील करण्यात आली आहे. मुंबईत बीकेसी, गोरेगाव इथे हजार बेडचं रुग्णालय उभं केलं आहे. तसेच आणखी हॉस्पिटल उभं करतोय. या सगळ्याला तोंड देण्यासाठी एकसंध रहायला हवं होतं. पण विरोधकांकडून राजकारण होत आहे. 


केंद्राने आम्हाला काय दिलं? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. केंद्राने आमचेच पैसे दिलेले नाहीत. जीएसटीचे पैसे केंद्राने दिले नाहीत तसेच केंद्रीय करातील आमचा वाटा दिलेला नाही. त्यामुळे उगीच शेखी मिरवायचं काम नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मुंबईत आहेत, महाराष्ट्राच्या सगळ्या भागावर लक्ष आहे, वेगवेगळ्या घटकांशी त्यांचा संवाद सुरू आहे, पण त्याची जाहीरात करायची आम्हाला सवय नाही. मुख्यमंत्री दिवसभर कामात असतात, अनेक गोष्टी करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांद्दल 'असं' विधान करणं चंद्रकांत पाटील यांना शोभत नाही. चंद्रकांत पाटील यांना मी नेहमी सांगतोय तुम्हीही बाहेर फिरू नका. कोरोनाचा धोका तुम्हालाही आहे, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.