मुंबई : दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार ( (Central Government) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) जबाबदार  असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकरी आणि गुंड यांच्यातील फरकच यांना कळत नाही असा आरोप त्यांनी केला. संसदेत आपण या मुद्यावर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Central Government, Home Minister responsible for Delhi farmer violence - Supriya Sule) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले. दिल्ली सिंघू बॉर्डरवर राडा झाला. आंदोलक शेतकरी आणि आणि स्थानिक असल्याचा दावा करणारे काही स्थानिक एकमेकांमध्ये भिडले. स्थानिक आंदोलक विरुद्ध शेतकरी आंदोलक आमने-सामने आल्यानंतर गोंधळ उडाला.स्थानिकांकडून आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही इथे लाठीमार केला.


सीताबाई यांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू


दरम्यान, दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील आंबापुर येथील सीताबाई रामदास तडवी यांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झालाय. केंद्र सरकार काळे कायदे मागे घेण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांचे जीव घेणार असा प्रश्न तडवी यांच्या कुटुंबाने उपस्थित केला आहे. सीताबाई या लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेतृत्वात दिल्लीला गेल्या होत्या. या आंदोलनात सहभागी होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या सीताबाई या महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी आहेत. त्या १५ जानेवारी रोजी दिल्लीला गेल्या होत्या. सीताबाईच्या मृत्यूमुळे सम्पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 


तर दुसरीकडे गाझियाबाद प्रशासनानं शेतकरी आंदोलकांना उत्तर प्रदेश गेटवरुन हटण्याचे आदेश दिलेत. आंदोलन स्थळ रिकामे करण्यासाठी रात्रीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. मात्र प्राण देऊ पण आंदोलन स्थळ सोडणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर दोन महिन्यांपासून बंद असलेला रस्ता खुला करण्यात आला आहे. पण रस्त्याच्या एकाच लेनवरुन वाहतूक सुरु आहे. एका रस्त्यावर अद्यापही शेतकरी आंदोलन चालू आहे. मात्र दुसरा मार्ग खुला केल्यामुळे गाजियाबाद दिल्ली वाहतूक सुरळीत सुरू झाली.