मुंबई : आज सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे चाकरमान्यांना चांगलाच त्रास होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत असताना मध्य रेल्वेचा हा गोंधळ झाल्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहे. आंबिवली-टिटवाळ्यादरम्यान हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 


ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. पण अद्याप रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सेवा पुन्हा किती वेळात सुरळीत होईल याची कोणतीही अधिकृत घोषणा प्लॅटफॉर्मवर केली जात नाही. नोकरदारांना खिडींत पकडण्याचा मध्य रेल्वेचा हा दिनक्रमच झाला आहे. 


दुपारच्यावेळेत झालेल्या या खोळब्यांमुळे नोकरदारांची तारांबळ उडाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. गाड्या उशिरानं धावत असल्यानं रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कधी ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा कधी पेंटाग्राफवर काही पडल्याने मध्य रेल्वेचं वेळापत्रकाचा बोजवारा उडत आहे.