मुंबई : तीन तासांत सांताक्रुजमध्ये 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सायन, माटुंग्यात रुळांवर पाणी साचलं आहे. हिंदमाता भागात रस्त्यावरही पाणी साचलं आहे. अनेक सखोल भाग पाण्याखाली गेला आहे. दुपारच्या सत्रात शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सकाळच्या शाळाही लवकर सोडण्यात आल्या आहेत.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबापुरीला पुरतं झोडपून काढलंय. सकाळी साडे आठ ते साडे अकरा या तीन तासात पश्चिम उपनगरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालंय. सगळ भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मध्य रेल्वेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं आहे. सायन आणि माटुंग्यात पावसाचं पाणी रुळावर आलं आहे. सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आता परिणाम होण्यास सुरु झाला आहे. सायय रेल्वे स्थानकात कंबरे ऐवढं पाणी साचलं आहे. दादरकडे येणारी धिम्य़ा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सायन ते कुर्ला दरम्यान सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मुंबईकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावं.