मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच
गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
मुंबई : गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. दरम्यान, पश्चिम रेल्व धिम्यागतीने सुरु आहे.
शेकडोच्या संख्येनं प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रात्रभर खोळंबून राहिले आहे. पण सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत वाहतूक अजूनही बंदच आहे. ठाण्याहून बदलापूर आणि टिटवाळ्याकडे वाहतूक सुरु आहे. शिवाय हार्बरची सेवाही पूर्णपणे बंद आहे.
ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा सुरू त्यामार्गे नवीमुंबईकडे जाणे शक्य आहे. दरम्यान आज पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली असून धीम्या गतीने काही होईन लोकल सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरळीत सुरू आहे.
पावसामुळे अनेक मुंबईकरांना अख्खी रात्रं रस्त्यावर, स्टेशन्सवर काढावी लागली. सकाळी उजाडताच मुंबईकर मिळेल त्या वाहनानं घरी निघालेत. मुंबईत पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे.