रुळाला तडे; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
जलद मार्गाची वाहतूक धिम्या मार्गावर
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड नाहूरदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती मिळत आहे. जलद मार्गाची वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
मुलुंड आणि नाहूरमधील जलद मार्गावरील रुळाला तडे गेले आहेत. रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.