मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbai) एक महत्वाची बातमी. मध्य रेल्वेवर (Central Railway ) उद्यापासून वातानुकुलित लोकल (AC local services) धावणार आहे. एकूण १० गाड्या चालविण्यात येणार आहेत. दरम्यान, या मार्गावर केवळ अधिकृत परवानगी असलेल्यांनाच प्रवासाची परवानगी असणार आहे. मध्य रेल्वेने वातानुकुलित लोकलचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. कुर्ला ते सीएसएमटी, सीएसएमटी ते डोंबिवली, डोंबिवली ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी या एसी लोकल धावणार आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर सध्याच्या सेवेऐवजी उद्यापासून १० वातानुकुलीत लोकल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सोमवार ते शनिवार या दिवशीच या लोकल धावणार आहे. प्रत्येक स्थानकात त्या थांबतील. तसेच रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे, असे मध्ये रेल्वेने म्हटले आहे.