Central Railway Job: दहावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असेल तर इतक्या कमी शिक्षणात कुठे नोकरी मिळणार नाही असे म्हटले जाते. पण हा समज खोटा ठरणार आहे. कारण तुम्ही दहावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुम्हाला मध्य रेल्वेत काम करण्याची संधी मिळणार आहे. येथे तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळू शकणार आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर केले पदासाठी लागणारी पात्रता, अनुभव, वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत  असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्णसोबत आयटीआय/एसएसएलसी कोर्स पूर्ण केलेला असावा. 


Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक


तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात आयटीआय/एसएसएलसी कोर्स पूर्ण केलेला असावा. 


ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. 


ट्रेन मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्या समकक्ष शिक्षण घेतलेले असावे. 


कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी


या पदभरतीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठविता येणार आहे. 


संगणक आधारित चाचणी (CBT), अभियोग्यता चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 41 वर्षे, ओबीसीसाठी 46 वर्षे, एससी/एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. तसेच उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क 


3 ऑगस्टपासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 2 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. 


IBPS अंतर्गत विविध बॅंकांमध्ये बंपर भरती


आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंका आयबीपीएस भरतीमध्ये सहभागी झाल्या आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. 21 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.