मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, अपघातात 1 ठार तर 3 जखमी
अंबरनाथ आणि बदलापूर ( Badlapur- Ambernath) दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असताना झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झालेत. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीचं काम करणाऱ्या मेन्टेनन्स मशीनमध्ये बिघाड झाला.
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर ( Badlapur- Ambernath) दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असताना झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झालेत. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीचं काम करणाऱ्या मेन्टेनन्स मशीनमध्ये बिघाड झाला.(Central Railway service disrupted ) त्यामुळे रूळांखाली लावले जाणारे स्लिपर्स अंगावर पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झालेत. पहाटे दोन ते पाच अशी ही दुरूस्ती सुरू होती. हे मेन्टेनन्स मशीन सध्या ट्रॅकवरच अडकून पडले आहे. हे मशीन हटवण्यासाठी क्रेनही आणण्यात आली. पण अजूनही हे मशीन हटवण्यात यश आलेलं नाही. दरम्यान जखमी रूग्णांना सायन रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे.
बदलापूर- अंबरनाथ स्थानकांच्या दरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे रूळखाली पटरी टाकणारे दुरुस्ती वाहन रुळावरून घसरल्याने सकाळी सहा वाजल्यापासून बदलापूर अंबरनाथ रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.(Central Railway service disrupted between Badlapur- Ambernath ) मध्यरात्री दोन वाजल्यापासून या भागात दुरुस्तीचे काम सुरू होते. या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. काम संपल्यावर उपजिल्हा रुग्णालयाजवळ रेल्वे मार्गावर हे वाहन घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळच्या वेळी बदलापूर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासनाकडून योग्य माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.
अंबरनाथ स्थानकातून मुंबईकडे जाणारी आणि येणारी वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे कळतात प्रवाशांनी बस, रिक्षा आणि खासगी वाहनांनी अंबरनाथ स्थानक गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यामुळे रिक्षा थांबा आणि बस थांब्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत होती. बदलापूर कर्जत रेल्वे सेवा ही सुरळीतपणे सुरू होती.
मात्र कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास होत होता. दुरुस्तीचे वाहन घसरलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे प्रशासनास प्रशासनातर्फे ट्विटरद्वारे देण्यात आली.