मुंबई : मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झालेलं मुंबईकरांचं जीवन पूर्वपदापवर येत आहे. ४८ तासांहन अधिक काळासाठी पावसाच्या सरी बरसत असल्यामुएळ मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मध्य, हार्बर आणि पश्मिच रेल्वे मार्गांवर याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र तब्बल १२ तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदीर्घ खोळंब्यानंतर सीएसएमटीहून पहिली लोकल रवाना झाली आहे.  सध्याच्या घडीला एकूण तीन लोकल सोडण्यात आल्या आबेत. ज्यामध्ये कल्याण आणि बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलचा समावेश आहे. असं असलं तरीही संपूर्ण वाहतुकीचं चित्र पूर्वपदावर येण्यास बराच वेळ दवडला जाण्याची चिन्हं आहेत. 


मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारपासूनच पावसाने जोर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. सोमवारी रात्री हे प्रमाण आणखी वाढलं आणि सखल भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. इतकच नव्हे तर, वाहतुकीच्या बऱ्याच मार्गांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झाला होता. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही याचा परिणाम झाला होता.