Mumbai Local News Update: मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ठाणे स्थानकातील (Thane Railway Station) प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी रेल्वे 60 तासांचा ब्लॉक घेऊ शकते. अद्याप रेल्वेने मेगाब्लॉकच्या तारखा जाहिर केलेल्या नाहीत. लवकरच याबाबत माहिती देण्यात येईल. ठाणे स्थानकाबरोबरच दादर रेल्वे स्थानकातील (Dadar) 1 आणि2 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे कामाचेही नियोजन करण्यात येणार आहे.  दादर रेल्वे स्थानकातील 1  आणि 2 प्लॅटफॉर्मवर गर्दी असते. तसंच, ट्रेनची वाट पाहणारे प्रवासीदेखील तिथेच असतात. त्यामुळं जागा अपुरी पडते. त्यामुळं लक्षात घेऊनच अधिक जागा उपलब्ध करुन देण्यासाठी तिथे असलेले स्टॉल आणि दुकाने हटवण्यात येणार आहेत.  (Mumbai Local Train News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे स्थानकात सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6  अप आणि डाउन लोकल ट्रेन आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी दर्दी करतात. तसंच, लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठीही प्रवासी प्लॅटफॉर्मवर त्यांचे सामान घेउन थांबतात. ठाणे हे जंक्शन असल्याने ट्रान्स हार्बर, ठाणे-वाशी-पनवेल मार्गावरुनही प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं अधिकाअधिक लोक प्लॅटफॉर्मवर येतात, असं मध्य रेल्वेच्या प्रवक्ताने म्हटलं आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पश्चिमेकडे आणि जागा उपलब्ध असेल तिथे रुंदीकरण करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मची रुंदी जास्तीत जास्त 2.5 मीटर ते 3 मीटर दरम्यान असेल आणि जेथे कमी जागा असेल तेथे प्लॅटफॉर्म कमी होईल. त्यामुळं प्लॅटफॉर्मवर फिरण्यासाठी अधिक जागा तयार होईल. 


या व्यतिरिक्त, प्लॅटफॉर्मच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही टोकांवर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पूर्व-पश्चिम फूट ओव्हर ब्रिज कार्यान्वित करण्यात येत आहे. लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी 60 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. काम सुलभ होण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे.