कर्जत : कामाला जाण्याच्या ऐन गडबडीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळी कर्जत स्थानकानजीक रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे ही अडचणीची परिस्थिती उदभवली. ज्यामुळे मध्ये रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा थेट परिणामं झाला असून, बऱ्याच रेल्रे गाड्य़ांची वाहतूक कर्जतपाशी थांबली आहे. गेल्या एका तासापासून ही वाहतूक थांबली असून, प्रशासनाने लगेचच दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही केली आहे. लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणत पुन्हा रेल्वे सेवा पूर्ववत करण्याकडेत यंत्रणांचा भर आहे. येत्या काही वेळातच मध्य रेल्वे पुन्हा एकदा सुरळीत होईल असं सांगण्यात येत आहे. 


एकिकडे बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपावर गेलेले असताना आता मध्य. रेल्वेतही हा खोळंबा झाल्यामुळे कामावर निघालेल्या वर्गाचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कर्जतकजडून येणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशिर होत असल्यामुळे पुन्हा एकदा या संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर खापर फोडण्याल सुरुवात केली आहे. संपकरी बेस्ट आणि मध्य रेल्वेचा होणारा खोळंबा पाहता दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे.