मुंबई : 2021-22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने 214 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील तिकीट तपासणीतून वसुलीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. एकूणच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेला बंपर कमाई झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील लोक त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनवर सर्वाधिक अवलंबून असतात. म्हणूनच या लोकल गाड्यांना मुंबईची लाईफ लाईन असेही म्हणतात. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात आणि आपापल्या स्थळी पोहोचतात. कोरोनाच्या काळात लोकल ट्रेनच्या वेगाला ब्रेक नक्कीच लागला होता.


कोरोनाचा निर्बंध लागू असताना लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. यादरम्यान, ट्रेनमध्ये एक चेकिंग टीम असायची आणि ते प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तिकिटाबद्दल प्रश्न विचारायचे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे टीटी दंड वसूल करत असे.


मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने 35.36 लाख लोकांवर कारवाई करताना 2021-22 या वर्षात 214.14 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे हे मोठे कारण आहे. हा आकडा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.