छत्रपती उदयनराजे यांच्यासमोर सध्या दोन पर्याय
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उदयनराजे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मुंबई : छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उदयनराजे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
यानंतर उदयनराजे यांच्यासमोर दोन पर्याय शिल्लक राहिल्याचं सांगितलं जातं, पहिला पर्याय म्हणजे उदयनराजे यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज करावा लागेल, यानंतरही जर सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, तर मग उदयनराजे यांना स्वत:हून पोलिस स्टेशनला हजर रहावं लागेल. मात्र यानंतरही उदयनराजे यांच्यावर काय पर्याय काढतात, हे लवकरच समजणार आहे.
उदयनराजे अचानक साताऱ्यात दाखल झाले, तेव्हा त्यांच्यामागे समर्थकांची मोठी गर्दी होती. यात उदयनराजे हे स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर होतील, अशी अपेक्षा पोलिसांनी होती. मात्र तसे झाले नाही. आता साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांना पुढीव पाऊल उचलावे लागणार आहे.