मुंबई : Rajya Sabha elections update : राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु आहे. भाजप तिसरी जागा लढण्यावर ठाम आहे. भाजप आणि मविआ दोघांकडूनही विधान परिषदेसाठी ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे याचा पेच कसा सुटणार याचीच आज उत्सुकता आहे.  दरम्यान, विधान परिषदेची नेमकी एक जागा कोणाची भाजपाला द्यायची याची चर्चा तीन पक्षाचे महाविकास आघाडी नेते करतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी फॉम्युला दिला की एक विधान परिषद जागा कमी करतो पण राज्यसभा तीन लढवू द्यावे, असा प्रस्ताव दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभा आणि विधान परिषद जागा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीकडून छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रसचे सुनील केदार आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. महाविकास आघाडीवतीने विनंती केली राज्यसभा एक जागा भाजपा  मागे घ्यावी.  राज्यसभा जागा मागे घेतली तर विधान परिषद जास्त जागा भाजपाला  देवू, असे भुजबळ म्हणाले. भाजपाला मान्य शेवटचा उमेदवार जास्त मत महाविकास आघाडीकडे जास्त आहे. चर्चा चांगली झाली. तीनपर्यंत मागे घ्यायची आहे. आम्ही नेत्यासोबत चर्चा करु, असे सांगितले आहे. पुढील दीड तासात डायरेक्ट चर्चा आम्ही फडणवीस समवेत करु. यात यश मिळेल असं वाटत आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 


महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आज राज्यसभेसाठीची बैठक झाली. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोघांनीही एकमेकांना ऑफर दिली. भाजपने तिसरी जागा सोडावी, त्याबदल्यात विधानपरिषदेची पाचवी जागा भाजपला देऊ अशी ऑफर महाविकास आघाडीने दिली. भाजपनेही नेमकी हीच ऑफर महाविकास आघाडीला दिली. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे असा प्रश्न आहे. 


महाविकास आघाडीने चौथी जागा लढवली नाही तर भाजप विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करेल अशी ऑफर भाजपने दिली. मात्र सहाव्या जागेसाठीचं संख्याबळ महाविकास आघाडीकडे अधिक असल्याचं मत भुजबळांनी मांडलं. आता भाजप नेते दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यानंतर काहीवेळानंतर पुन्हा फडणवीसांशी महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार आहेत.