अजित पवारांनी दोन दिवस भावनांना आवर घालायला पाहिजे होता; भुजबळांचा टोला
अजित पवार यांनी त्याच दिवशी राजीनामा दिल्याने फोकस बदलला.
मुंबई: विधानसभा निवडणूक ऐन भरात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसंदर्भात भाष्य केले होते. काही नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक झाली, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांवर निशाणा साधला होता.
'शरद पवार यांची संपूर्ण कारकीर्दच विश्वासघातकी'
यानंतर आता छगन भुजबळ यांनीही अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य केले. शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायला नको होता. भावनांना आवर घालून दोन दिवसांनी राजीनामा दिला असता तरी चालले असते. परंतु, अजित पवार यांनी त्याच दिवशी राजीनामा दिल्याने फोकस बदलला, असे भुजबळ यांनी म्हटले.
भुजबळ यांच्या या पलटवारानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो.
मोदींच्या पुण्यातल्या सभेसाठी एसपी कॉलेजमध्ये वृक्षतोड
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसंदर्भातही छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. १९९३ च्या दंगलीबाबत मनोहर जोशी यांनी श्रीकृष्ण आयोग नेमला होता. युतीच्या काळात फाईल तयार झाली, मी त्यावर फक्त सही केली. बाळासाहेबांना अटक करून मला कोणताही आनंद झाला नाही. मी त्यांना तुरुंगात पाठवणारच नव्हतो. ते शक्य झाले नाही तर त्यांना मातोश्रीवरच ठेवणार होतो, असेही भुजबळ यांनी सांगितले.