चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कात्री
चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट घातला आहे.
मुंबई : राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट घातला आहे. निवडणूक रणसंग्रामात जनतेच्या मनातली अस्मिता टिकवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी वापर केला जातो. मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे.
चौथीच्या वर्गाला शिवाजी महाराजांचा इतिहास गेली अनेक वर्षे शिकवण्यात येतो. १९७०मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित झाल्यानंतर त्याच्या मांडणीत कालानुरूप काही बदल झाले. मात्र चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मूळ गाभा तोच ठेवण्यात आला. मात्र आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने यात बदल करत शिवाजी महाराजांचा इतिहासच गायब केला आहे.