मुंबई : शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहेत. (Coronavirus in Mumbai)  रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्युतही वाढ दिसून येत आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज क्षयरोग रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव (Dr. Manisha Jadhav ) यांचे कोरोनाने निधन झाले. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या  काम पाहत होत्या. त्यांचा निधनाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. (Chief Medical Officer Dr. Manisha Jadhav dies due to corona at Kandivali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून  डॉ. मनिषा जाधव यांना ताप येत असल्याने कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात खातेप्रमुख या पदावर कार्यरत आहेत.



त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी फेसबूकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती आणि मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही, अशी खंत व्यक्त करत आपल्या मृत्यूची पुसटशी कल्पना दिली होती. दरम्यान,  महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या जाण्याबाबत शोक व्यक्त केला आहे.  डॉ. मनीषा जाधव या काळजीपूर्वक सर्वांची विचारपूस करायच्या, उत्तम काम करत असत. त्यांना कोरोनाची लागण झाली तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कर्तव्यदक्ष अधिकारी त्या होत्या, आम्ही कर्तव्यदक्ष डॉक्टर गमावला, अशा शब्दात त्यांनी आपले दु:ख  व्यक्त केले.