संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेतक-यांचे ट्रक अडवून हिंसा घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. संपामुळे शेतकरी वेठीस धरला जात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
आधीच्या सरकारने दुधाचा ब्रँड बंद केल्यामुळेच दुधाला भाव मिळालेला नाही. राजकीय नेत्यांचे दूध संघ तेजीत आणून सरकारी ब्रँड अडचणीत आणल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केली.
संपाद्वारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही अशी लोक शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि दूध अडवत आहे असे ते म्हणाले. शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक असून आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.