Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमख्यमंत्र्यांच्या भेटीला, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक
दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत.
कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या महिन्यानंतरही मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार रखडलेला आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत. या भेटीत या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. (chief minister eknath shinde arrived at sagar bungalow to meet deputy chief minister devendra fadnavis)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या आणि पर्वा (6 आणि 7 ऑगस्ट) पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकूण 2 दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याआधी ही भेटी महत्त्वाची समजली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्लीवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
असा आहे दिल्ली दौरा
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा एकूण 2 दिवसांचा हा दिल्ली दौरा आहे. देशात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सावानिमित्ताने 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवण्यात येणार आहे.
'हर घर तिरंगा' या अभियानासंदर्भात भाजपची बैठक 6 ऑगस्टला पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री या दौऱ्यादरम्यान रविवारी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
तसेच या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हा दिल्ली दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.