मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुलकावणी देत दिल्लीत, अमित शाह भेटीत असा ठरला मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला
Chief Minister Eknath Shinde met Amit Shah in Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन गुरुवारी पहाटे मुंबईत.
मुंबई : Chief Minister Eknath Shinde met Amit Shah in Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन गुरुवारी पहाटे मुंबईला परतल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि शाहांमध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाली आणि 60-40 असा फॉर्म्युला ठरल्याचं सांगण्यात येत आहे.
31 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदेंनी पाच वेळा दिल्लीवारी केली. पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही.
बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी धडकली. पण काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र सगळ्यांनाच हुलकावणी देत मुख्यमंत्री शिंदे यांचं बुधवारी रात्री दिल्लीत गेल्याचं आता समोर येते आहे.