मुंबई : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांबाबत (Msrtc Employees) मुख्यमंत्र्यानी(chief minister मोठे आदेश दिले आहेत. एसटी संप काळात (msrtc strike) बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (chief minister eknath shinde order to reinstate dismissed employees during msrtc strike sources info)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे यांचे आदेश दिले आहेत.


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी मिळाव्यात, तसेच महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महिने संप केला होता. सरकारने अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजु न झाल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.