PM Modi: `लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...`, मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
PM Modi inaugurate Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो 2 ए आणि 7 चे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आदी उपस्थित होते. यावेळी BKC ग्राउंड वर आयोजित केलेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी नरेंद्र मोदींच तोंडभरून कौतुक केलं. त्यावेळी त्यांनी दावोसमधील (Davos World Economic Forum) किस्से सांगितले आहेत. (Chief Minister Eknath Shinde praised Modi while sharing his experience in Davos marathi news)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे मला दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा दिसला, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मी जेव्हा दावोसमध्ये गेलो. तेव्हा मला जर्मनी, सौदी अशा अनेक देशांचे प्रमुख नेते म्हणायचे, तुम्ही मोदींसोबत आहात ना? तेव्हा मी त्यांना सांगायचो.. होय, आम्ही मोदींचीच माणसं आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावेळी त्यांनी मोदींनी मेट्रोचं भूमिपूजन केलं तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, काहींना मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती. पण नियतीसमोर काही चालत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मोदींच्या व्यक्तीमत्त्वामुळे असं काही आहे की, जे आपल्याला उर्जा देतं. येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याआधी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी देखील संधी साधली. 20 ते 25 वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली. 20 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या केवळ स्वतःची घरं भरली, असा जहरी टीका फडणवीसांनी केली आहे.