मुंबई : Chief minister uddhav thackeray discharged  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आता 21  दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव हे रुग्णालयातून घरी परतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुख्यमंत्री उद्धव यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरे यांवर शस्त्रक्रिया केली होती. आज केलेल्या तपासणी अहवालानंतर उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज देण्यात आला.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 22 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. एच एन रिलायन्स रूग्णालयात उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात म्हटले होते, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणले तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. 


मानेच्या या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहोत. दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल, अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केली होती.