मुंबई :   शिवरायांना वंदन करून उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक मजल्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली.नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने मंत्रालय सज्ज होते. पोलिसांची सुरक्षाची नेहमीपेक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सहाव्या मजल्यावर जाऊन मुख्यमंत्री कार्यलयात मुंख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत अहवाल मागवला आहे. त्याबाबतही ते आज आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९वे मुख्यमंत्री ठरलेत. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर शिवसेना-राष्ट्रवादी -काँग्रेसच्या महाष्ट्र विकासआघाडीचे सरकार आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. उद्धव यांनी भगवा सदरा परिधान केला होता. ते मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर थेत हुतात्मा चौकात जावून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या दिशेन कूचकेली. त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र विकासआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्रीही उपस्थित होते. शिवसैनिकांचा मोठा उत्साह ओसंडून वाहत होता.




मातोश्रीबाहेरशिवसैनिकांची गर्दी


दरम्यान, सकाळी मातोश्रीवर शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात झाली होती. मातोश्रीबाहेर खूप गर्दी झाली होती. काहीवेळापूर्वी उद्धव ठाकरे मंत्रालयाकडे निघालेत. आज ते मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. उद्धव ठाकरे यांना भेटायला विदर्भातील ग्रामीण भागातून शेतकरी शिवसैनिक आले आहेत. या शिवसैनिकांच्या उद्धव ठाकरे यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची ओएसडी म्हणजे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



नावाची पाटी बदलण्यात आली


आज सकाळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नावाची पाटी बदलण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे असे संपूर्ण नाव पाटीवर लिहिण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वीच ही सर्व तयारी करण्यात आली आहे. कार्यलयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली आहे. 


 मुख्यमंत्री उद्धव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


तसेच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र विकासघाडीच सरकार आले आहे. मात्र मातोश्री बाहेर ठाकरे सरकार असल्याची बँनेरबाजी करण्यात आली आहे. मातोश्री आणि कलनागर परिसरात अनेक बँनर लावण्यात आले आहेत. रात्रीतून अनेक नवीन बॅनर झळकत आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाल्याचे ही बॅनर्स झळकलेले दिसताहेत. शिवसेना शाखाप्रमुख विभागप्रमुख आमदार यांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.