मुंबई : Chief Minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे काय बोलणार याचीच उत्सुकता आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाष्य करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray's Jayanti) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.  महापालिका निवडणुका आणि विरोधकांकडून सातत्याने होणारे आरोप, वचननाम्याची पूर्तता, निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देण्याची शक्यता आहे.


बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे मुंबईत येत असतात. परंतु कोरोनामुळे दोन वर्षे यात काही प्रमाणात खंड पडला होता. शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणे शिवसैनिकांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. ते मार्गदर्शन करताना काय बोलणार याची उत्सुकता आहे. 


आगामी मुंबईसह राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. ते त्यांना काय संदेश देणार याचीही उत्सुकता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यात कोठे आघाडी होणार का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.