मुख्यमंत्री महोदय आपण निर्णय घ्या, त्याला आमचा पाठिंबा असेल - अजित पवार
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री जो निर्णय घेतली त्याला आमचा पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे. सर्वांचे ऐकून मुख्यमंत्री महोदय आपण निर्णय घ्या. त्याला आमचा पाठिंबा असेल असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
'वित्त विभाग म्हणून आम्ही गरीब वर्गाला कशी मदत करता येईल हे पाहू. मदत करावी या मताचा मी आहे'. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत याचे संकेत दिले आहे. त्यामुळे लवकरच राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लसींचा तुटवडा, बेड्स उपलब्ध नाहीत, वेंटिलेटर फुल्ल झाले आहेत. पण कोरोना रुग्णांची दररोज होणारी वाढ ही कायम आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत म्हटलं की, 'आपण कठीण परिस्थितीतून चाललो आहोत. लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही पण जगाने तो स्वीकारला आहे. मधला काळ बरा होता. तरुण वर्ग आता जास्त बाधित होतोय. आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे.'