मुंबईची वीज घालवण्यामागे चीनचाच हात, गृहमंत्र्यांचा शिक्कामोर्तब
मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे. या 'बत्तीगुल' प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला होता. या तपासाचा सायबर सेलने अहवाल गृहविभागाला सादर केला आहे. हा अहवाल गृहविभागाने ऊर्जा विभागाला सादर केला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
रेकॉर्डेड फ्यूचर अॅनलिसिस या अमेरिकन कंपनीने याचा तपास केला होता. मुंबईच्या वीज यंत्रणेत मॉलवेअर घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं या कंपनीने म्हटलं असल्याचं, अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. हा सायबर हल्ला आहे का? याची चौकशी करावी, अशी विनंती ऊर्जा विभागाने केली होती.
स्काडा सिस्टीमचा अभ्यास सायबर सेलने केला
या अहवालात हा सायबर हल्ला असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ८ जीबी डाटा फॉरेन अनअकाऊंटमधून MSEBमध्ये ट्रान्स्फर झालेला असू शकतो. लॉगइन करण्याचा प्रयत्न झाला असू शकतो, असं अहवालात म्हटलं आहे.
१४ ट्रोजन हार्सेस सर्व्हरमध्ये टाकले असावेत, असं अहवालात म्हटलं आहे. आमच्या तपासात आलंय काही परदेशी कंपन्यांनी MSEB च्या सर्व्हेरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला होता. मुंबईची आयलॅडींग कोसळून संपूर्ण मुंबई अंधारात होती. या प्रकरणात घातपाताचा संशय मी व्यक्त केला होता. त्या दृष्टीने मी. गृहमंत्र्यांना विनंती केली सायबरकडून चौकशी करावी. त्यानुसार सायबर सेलने चौकशी करून आपला अहवाल सादर केला आहे.