मुंबई : मुंबई महापालिकेच्या हजारो रुपयांच्या ठेवी तसंच अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची वेतन खातीही अॅक्सिस बँकेतून काढून राष्ट्रीयीकृत बँकेत नेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रीयीकृत बँका सुरक्षित असल्यानं आम्ही त्याबद्दल विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याआधी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती इतर सरकारी बँकांमध्ये वळवण्याचे आदेश ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतली खाती इतर बँकांमध्ये वळवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात सध्या वॉर सुरु असताना यावर भाजप नेत्या चित्रा वाघ शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 



'प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे, कुठली महिला ही कुठल्याही नेत्याची जरी पत्नी असली तरी प्रत्येकाचं स्वतःचं असं वलय आहे. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने व्यक्त होण्याचा अधिकार असतो. त्यापद्धती जर कोणी व्यक्त झालं असेल तर त्यात काही गैर नाही. पण ज्या पद्धतीने महिलेने महिलेची विभसना केली ते मात्र फार चुकीचं आहे. अशी प्रतिक्रिया भाजपच्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.



'अमृता फडणवीस यांना ज्या प्रकारे ट्रोल केलं गेलं. ते चुकीचं असल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी त्याचा निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना आणि त्यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. याच वादात आता चित्रा वाघ यांनी उडी घेत शिवसेनेचा निषेध केला आहे.