मुंबई : भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांच्या पतीसोबतच्या फोटोंमध्ये छेडाछाड करण्यात आली असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यांच्या पतीऐवजी वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांचे फोटो लावण्यात आले आहेत. (Chitra Wagh Photo with Sanjay Rathod goes viral on Social Media) चित्रा वाघ याबाबत पोलिसांत तक्रार करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या प्रकारावरून भाजप नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. असा प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी अशी मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. संजय राठोड यांची चौकशी करण्याऐवजी या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला आहे. 


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक व्हिडीओ क्लीप आणि फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात आता भाजप नेत्या चित्रा वाघा यांनी देखील उडीत घेतली होती. तसेच या प्रकरणावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अनेक दिवस उलटूनही गुन्हा का दाखल केला नाही? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. तर पुणे पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा अशी मागणी देखील केली आहे. 



पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांकडून तपास काढून सक्षम आयपीएस अधिका-याकडे तपास देण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. चित्रा वाघ यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.