मुंबई : अनेक महिन्यांपासून CIDCO घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी धारकांसाठी गुडन्यूज आहे. कारण सिडकोच्या 2018-19 मधील अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा ताबा दिला जाणार आहे. सिडकोने 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या ठिकाणी सुमारे 25,000 घरे बांधले असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देखील यात घरे दिली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्प उत्पन्न गटाकरिता देखील घरे देण्यात आली होती. आता या घरांचा ताबा लवकरच मिळणार आहे. ऑक्टोबर 2020 हा ताबा मिळणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे याला उशीर झाला.


1 जुलै 2021 पासून टप्प्याटप्प्यात हा ताबा दिला जाणार आहे. ज्या अर्जदारांनी घरांचे सर्व हफ्ते भरले आहेत, त्यांना बाकी असलेले इतर शुल्क भरण्यासाठी 1 जून 2021 पासून 1 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.


ज्यांचे हफ्ते थकले होते अशा अर्जदारांना हफ्ते भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आली आहे. सिडकोच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांना लवकरच आपलं हक्काचं घऱ मिळणार आहे.