दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. २५ तारखेला १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची ८ मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 


शिवसेना बाजी मारणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध विद्यार्थी संघटनांकडून ६२ हजार ५५९ मतदार नोंदणी आहे. यात शिवसेनाप्रणित युवा सेनेची सर्वाधिक नोंदणी आहे. गेल्या निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून आदित्य ठाकरे यांनी छाप पाडली होती. यंदाही सिनेट निवडणुकीत युवा सेनेचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. 


मनसेची निवडणुकीतून माघार


५० टक्के जुने सदस्य आणि ५० टक्के नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे विद्यार्थी सेनेची निवडणुकीतून माघार घेतली आहे. गेल्या निवडणुकीत सुधाकर तांबोळी आणि गणेश चव्हाण हे २ सदस्य निवडून आले होते. विजयासाठी आवश्यक मतदार नोंदणी न केल्यानं यंदा सिनेट निवडणुकीत मनसेचे पॅनल नाही. पण सुधाकर तांबोळी अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तांबोळी मनसे पुरस्कृत उमेदवार आहेत. 


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही रिंगणात


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचीही निवडणूक लढवण्याची तयारी आहे. त्यांची १० जागा लढवण्याची प्राथमिक तयारी आहे. शिवसेनाप्रणित युवा सेनेला रोखण्यासाठी काही विद्यार्थी संघटनांची पडद्यामागे युती होण्याच्या हालचाली होऊ शकतात. राजकीय पक्षांची ताकदही आपापल्या विद्यार्थी संघटनांच्या यशासाठी पणाला लागणार आहे.