मुंबई :  शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेत (MNS) नवं युद्ध सुरू झालंय. यावेळी तर मनसेनं शिवसेनेवर चक्क चोरीचा आरोप केलाय. कोण असली, कोण नकली, असा सवाल पुन्हा विचारला जातोय. काय आहे ही सेना-मनसेमधली नवी लढाई.... पाहुया.. (classes in shiv sena and maharashtra navnirman sena over to shivsena aurangabad meeting trailer) 
 
हीच ती शिवसेना-मनसेमधली नवी ठिणगी. आवाज कुणाचा... शिवसेनेचा म्हणत शिवसेनेची औरंगाबादमध्ये 14 मे ला भव्य दिव्य सभा होतेय. त्यासाठी एकापाठोपाठ एक सभेचे टीझर रिलीज केले जातायत. त्यातलाच हा नवा टीझर. याच टीझरमध्ये शिवसेनेनं राज ठाकरेंच्या सभेतल्या गर्दीचं फुटेज वापरल्याचा खळबळजनक आरोप मनसेनं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरून हा दावा करत शिवसेनेच्या ट्विटचे स्क्रिनशॉट्स शेअर केलेत आणि शिवसेनेनं हे टीझर डिलीट केल्याचा दावाही केला आहे. शिवसेनेनंही मनसेच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. 


भोंगा, मनसैनिकांवरची कारवाई, अयोध्या दौरा आणि राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र यावरुन महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगलाय.


त्यात आता या नव्या व्हीडिओ चोरीच्या आरोपाची भर पडलीय. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेला तुफान गर्दी झाली होती. आता 14 मे ला मुख्यमंत्र्यांची सभा होतेय. जनतेचे मुद्दे, समस्या आणि प्रश्नांवरची लढाई आता तुझ्या सभेला जास्त गर्दी की माझ्या सभेला, यावर येऊन पोहोचलीय.