मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा, कर्जमाफीची व्याप्ती वाढली
राज्य सरकार कर्जमाफीची व्याप्ती वाढवणार आहे.
मुंबई : राज्य सरकार कर्जमाफीची व्याप्ती वाढवणार आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१२ ऐवजी आता २००९ पर्यंतचे थकीत कर्जदारही कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत. पिककर्ज, तसंच मध्यममुदत कर्ज घेतलेल्या शेतक-यांना त्याचा फायदा होणार आहे.
तसंच नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे. तर पिककर्जाची परतफेड करण्यासाठी 30 जूनऐवजी 31 जुलैपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. शिवाय पिककर्ज भरल्यास 25 % किंवा 25 हजारांचं सरकारकडून अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.