मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांवर सोपविली `ही` महत्त्वाची जबाबदारी
धुळ्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे.
मुंबई: जळगाव आणि जामनेर पालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचे विजयाचे शिलेदार ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी जबाबदारी दिली आहे. आगामी काळात धुळे महापालिकेची निवडणूक होत आहे. जळगावप्रमाणे धुळ्यातही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी गिरीश महाजन आणि भाजप प्रदेक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपविली आहे.
येत्या तीन दिवसांत धुळ्यात सर्वच भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एकत्र बैठक बोलावून गटबाजी संपवून जळगावप्रमाणे धुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणू असा दावा देखील गिरीश महाजन यांनी केला आहे.
दरम्यान, धुळे महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा परिषद अहमदनर महापालिका निवडणुकीतदेखील आपण लक्ष घालणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.