मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. 


या  आगीच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले असून याप्रकरणी गुन्हे  दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच हॉटेलचे मालक किंवा संचालक दोषी असतील, तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील,  असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.


पाच अधिकारी निलंबित


आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं आढळून आल्यानंतर 'जी दक्षिण' विभागातील इमारत आणि कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश बडगिरे आणि सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या ५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.


तडकाफडकी बदली


तर, सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.