मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदर्शनवरुन जनसंबोधन करणार आहे. आज सायंकाळी ७.३० वा मुख्यमंत्र्यांचं भाषणाचं डीडी सह्याद्रीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. झी24 तासवर देखील तुम्ही हे थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलं आहे. एकीकडे रस्त्यावरील आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आत्महत्या देखील होऊ लागल्या आहेत. आज पुण्यात मराठा आंदोलकांची बैठक होत असून मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.