मुंबई : पालघर निवडणुकीत शड्डू ठोकल्यानंतर आता भाजपनं पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. यापुढे निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातले पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत होतेय. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना सोबत असेल किंवा नसेल तरी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलीय. मात्र, शिवसेना सोबत आली नाही तर निवडणूक जिंकणं अवघड आहे, ही धारणा पालघरनं खोटी ठरवल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय. 


फाईल फोटो

आजच्या बैठकीत विधान परिषदेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.


अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला


अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. अमित शाह उद्या मुंबईत आहेत.. या दौऱ्यादरम्यान ते मातोश्रीवर जाऊन उद्ध ठाकरेंची भेट घेणार आहे.. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीची चर्चा होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. 'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शाह उद्या संध्याकाळी ६.०० वाजता मातोश्रीला जात शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचेच सरकार येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी मुंबईच्या भाजप महामेळाव्यात केली होती. म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याची भाजपाची खुमखुमी उतरली होती आणि मित्र पक्षांना बरोबर घेण्याची भाजपाची भाषा सुरू झाली होती. याचाच एक भाग म्हणून भाजपाचे समर्थन वाढवण्याचा एक भाग म्हणून अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजतंय.