COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शन वाहिनीवरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाज, आरक्षण, नोकरी अशा वेगवेगळ्या विषयांना हात घातला. ७ ऑगस्टला राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेली वेळ संपणार असून ते आपली भूमिका मांडणार आहेत. उशीरात उशीरा नोव्हेंबरपर्यंत वैधानिक कारवाई पूर्ण करण्याचा राज्यसरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेगा भरती झाली तर आरक्षणाचा फायदा मिळणार नाही असा मराठा तरुणांचा समज आहे. पण त्यांना न्याय कसा देता येईल हा प्रयत्न आहे. यासंदर्भातील कायदेशीर कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत मेगा भरती सुरू होणार नाही असेही त्यांनी सांगितले. मराठा तरुणांना कर्ज मिळण्यासाठी योजना तयार केली.


धनगर समाज आरक्षण 


धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नी राज्य सरकारने TISS ला अभ्यास करण्यास सांगितलंय. ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत तो अहवाल आपल्याला मिळणार असून पुढची कार्यवाही होणार आहे.


महाराष्ट्रात रोजगार 


गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८ लाख रोजगार आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात आल्याचेही त्यांनी सांगितले. 
एकीकडे गुंतवणूक येत असताना मुठभर लोक संघर्षाला बदनाम करत हिंसा करत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. जाळपोळीमुळे उद्योगांना फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले. तरुणाईच्या आत्महत्या हा यावेळचा गंभीर मुद्दा असल्याचेही ते म्हणाले.


संवादातून मार्ग काढूया


आंदोलन आणि संघर्ष आता पुरे झाला आता आपण संवादातून मार्ग काढूया असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री यांनी केलं.