मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी १ वाजता, भाईंदरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना हा अपघात झाला.
भाईंदरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उतरत असताना, हेलिकॉप्टर चालकाला अचानक केबलची वायर समोर दिसली. ही वायर समोर दिसल्यानंतर हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगावधान राखून, हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले आणि दुसऱ्या जागी उतरवले.
हेलिकॉप्टर उतरताना जर चालकाचं लक्ष गेलं नसतं तर मोठा अपघात घडला असता. यानंतर परतताना मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने न जाता, खबरदारीचा उपाय म्हणून, वाहनाने मुंबईला परतले.
सीएम देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावण्याची ही चौथी घटना आहे. दरम्यान, अशी कोणतीही घटना भाईंदरमध्ये घडली नसल्याुचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.