शेतकरी नेत्यांची चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
शेतकरी नेते आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शेतकरी नेते आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नारपार, दमणगंगा, पिंजा या नदीजोड योजना करून राज्यात पाणी आणलं गेलं पाहिजे, तसंच महाराष्ट्रातलं पाणी महाराष्ट्रात म्हणजे गोदावरी आणि गिरणा खोऱ्यात पाणी आणलं गेलं पाहिजे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील मानधन वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लवकरच जास्त जास्त मागण्या पूर्ण करण्याकडे सरकारचा कल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.