मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला. दिल्लीत त्यांनी अनेक भेटीगाठी घेतल्या आहेत. या दौऱ्याचा राजकीय अजेंडा नाही असं बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी माझ्या संपर्कात कोणीही नाही. खासदारांच्या बैठका होतात त्याबद्दलही मला काही माहिती नाही. कामानिमित्ताने त्यांची भेट होत असते असं उत्तर दिलं. 


मुळात जे आमदार माझ्यासोबत आले ते विकलेले नाहीत. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ते स्वत:च्या मर्जीने आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. माझ्या संपर्कात कोणीही खासदार नाहीत असंही त्यांनी यावेळी म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला. 


तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे आमच्या संपर्कात असल्याचं सांगत त्याचं नाव फोडलं आहे. 15 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. यावर एकनाथ शिंदे यांनी कोणीही संपर्कात नसल्याचं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला. पण फडणवीसांनी एक नाव फोडल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.