मुंबई : मुंबईतील शिवसेनेच्या दोन्हीही म्हणजेच ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group)  दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) सुरुवात झाली आहे. या मेळाव्याच्या सुरूवातीलाच मंचावर पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांनी विश्वविक्रम (Word Record) केला आहे. काही अधिकाऱ्यांनी मंचावर पोहोचत एकनाथ शिंदे यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करत त्यांचा सत्कार केला. त्यामुळे नेमका कोणता विश्वविक्रम मुख्यमंत्र्यांनी केलाय अशी चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरू झालीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde)  दसरा मेळाव्याच्या (Dussehra Melava) मंचावर पोहोचताच वर्ल्ड बुक ऑफ लंडनच्या (World book of London) अधिकाऱ्यांनी त्यांचा शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला. दरम्यान त्यांच्या नावे असा कोणता विक्रम झाला आहे, असा प्रश्न आता शिवसैनिक आणि सर्वसामान्यांना पडला आहे. 


शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्यात (Dussehra Melava)  51 फुटी तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीने हा विश्वविक्रम  (Word Record) केला आहे. त्यामुळे या 51 फुटी तलवारीचे वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये (World book of London) नोंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मंचावर येत मुख्यमंत्र्यांना प्रशिस्तीपत्रक प्रदान करून त्यांचा सत्कार केला.  


दरम्यान आज दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदे (Cm Eknath shinde) यांच्या हस्ते या 51 फुटी तलवारीचे शस्त्रपुजन करण्यात येणार आहे. त्यामुळेच ती या मेळाव्यात आणण्यात आली आहे. तसेच शिंदे आणि ठाकरे गटात पक्षचिन्हावरून वाद सुरु आहे. हा वाद कोर्टात देखील पोहोचला होता.मात्र कोर्टाने निवडणूक आयोगाला यावर निर्णय देण्याचे अधिकार असल्याचे म्हटले होते. त्यात आता यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना धनुष्यबाण चिन्ह गोठवलेही जाऊ शकते. त्यामुळे शिंदे गटाने (Cm Eknath shinde) नवीन चिन्हाबाबत तयारी केल्याची चर्चा आहे.