Eknath Shinde : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) म्हणजेच एमसीएच्या निवडणुकीत (MCA Election) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) एकत्र आले आहेत. एमसीए निवडणुकीत शरद पवारांनी आशिष शेलार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच MCA निवडणुकीआधी हाय व्होल्टेज पोलिटिकल ड्रामा पहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी (MCA President Election) नामांकन अर्ज भरला आहे. त्यानंतर शेलारांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी देखील अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरलाय. त्यामुळे आता MCA च्या अध्यपदाची निवडणूक आणखीच रंगदार झाली आहे. अशातच आता या निवडणुकीत एक वेगळा ट्विस्ट पहायला मिळतोय.


क्रिकेटच्या राजकारणात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उडी घेतली आहे. MCA निवडणुकीतील 106 मतदारांशी शिंदेंची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. शेलार आणि शरद पवारांचं संयुक्त पॅनल MCA निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. त्याला शिंदे गटाचा देखील पाठिंबा मिळाला आहे.


आणखी वाचा - शिंदे गटाच्या 31 आमदारांना 'Y' दर्जाची सुरक्षा, आमदारांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) सहयाद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे आता सहयाद्री अतिथीगृहावर झालेली बैठक खास चर्चेचा विषय ठरली आहे. 2016 साली आशिष शेलार एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर 2 वर्ष आशिष शेलार त्यांनी एमसीएचं अध्यक्षपद सांभाळलं होतं.


11 वर्षानंतर असं घडतंय..


11 वर्षापूर्वी म्हणजेच 2011 साली दिलीप वेंगसकर विरुद्ध विलासराव देशमुख अशी निवडणूक झाली होती. त्यावेळी क्रिकेटर विरुद्ध राजकारणी असा सामना रंगला होता. त्यानंतर आता 11 वर्षानंतर आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील असा मुकाबला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतील उत्सुकता आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय.