CM on Sanjay Raut ED Inquiry :  शिवसेनेचे खासदार आणि धडाडीचे नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांच्या घरात तपास सुरु आहे.  या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु आहे, त्यांना अटक होईल की नाही हे मी सांगू शकत नाही, कर नाही तर डर कशाला असली पाहिजे, आता ईडी चौकशीतून पुढे काय समोर येईल ते कळेच, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. 


ईडीच्या कारवाईच्या भीतीने कुणीही येऊ नका, शिवसेनेकडेही येऊ नका भाजपकडेही येऊ नका, आम्हाला दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही असं जाहीर आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.


केंद्रीय तपास यंत्रणांनी यापूर्वी ज्या कारवाई केल्या आहेत त्या सूडाने केल्या असत्या किंवा चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती, तर न्यायालयाने लगेच संबंधित व्यक्तींना दिलासा दिला असता. 


आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं, इतक्या मोठ्या घडामोडी झाल्या, त्यात एकतरी सूडाची कारवाई झाली का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थि केला. जितके आमदार किंवा खासदार आमच्याकडे आले त्यांनी एकाने तरी सांगितलं का आम्हाला ईडीची कारवाई आली म्हणून आम्ही आलो असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.


इतकंच नाही तर सरकार टीकेले आणि कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.