मुंबई : मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील विचारवंत, साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार, माजी न्यायाधीश, माजी सनदी अधिकारी आणि कलाकारांना आमंत्रित केलं आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु झाली आहे. मराठा आरक्षण आणि सध्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री या सर्वांशी चर्चा करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला एकूण 48 जणांना आमंत्रित केलं आहे. छत्रपती शाहू महाराज, एन. डी. पाटील, जयसिंग पवार, डॉ. आ. ह. साळुंखे, सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, प्रतापसिंह जाधव, प्राचार्य अनुरुद्र जाधव, माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, पांडुरंग बलकवडे, राम ताकवले यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.



आतापर्यंत डॉ. आ. ह. साळुंखे, नितीन चंद्रकांत देसाई, पांडुरंग बलकवडे, भैरवनाथ ठोंबरे, अमोल कोल्हे, सतीश परब, सदानंद मोरे बैठकीला पोहचले आहेत.