मुंबई  : काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 



आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोठ्या स्तरावरून कोरोना लसीकरणाबाबत जी मागणी केली जात होती. त्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. (Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine) 



कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा लवकरच पार होणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.