COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यातील महत्वाची बैठक नुकतीच संपलीय. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकर्‍यांशी संबधित विधेयकावर यावेळी चर्चा झाली. या विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वाची मानली जातेय. वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. साधारण पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली.


आता शरद पवारांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यसभेत शेतकरी विधेयकासंदर्भात  काय भूमिका घेणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढताना दिसतेय. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मागच्या काही दिवसात वाढलाय. या मुद्द्यावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली. 


तसेच मराठा आरक्षणाबाबत देखील दोघांमध्ये महत्वाची बोलणी झाल्याचे कळते.