मुंबई : मलबार हिल इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा कवच भेदून एकाने त्याची कार थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली. मुख्यमंत्र्यांच्या कार समोरच त्याने कार घुसवल्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. विशेष म्हणजे पोलिसांनी या व्यक्तीला काहीही न करता सोडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारच्या सुरक्षा व्यवस्थेत अनोळखी कार घुसूनही कार मालकावर मुंबई पोलिसांची कोणतीही कारवाई नाही...?


उच्चभ्रू वस्तीतील हा व्यक्ती असल्यानं त्याच्यावर कारवाई करण्याकडे कानाडोळा केला. परंतु हीच घटना मुंबईच्या इतर भागात झाली असती तर मग पोलिसांनी काय केले असते हे वेगळे सांगायला नको. मुंबई पोलिसांच्या निश्क्रियतेवर, आणि पोलिसांच्या दूहेरी भूमीकेवर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा राजभवन येथून वर्षा निवास्थानी जात असताना एका श्रीमंत व्यक्तीने त्याची कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षाकडे कडे तोडून मध्ये घुसवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा अचनाक तात्काळ थांबवावा लागला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कोणत्याही पोलिसांनी या श्रीमंत व्यक्तीची कार अडवली नाही किंवा त्याला जाबही विचारला नाही. 



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा कडे तोडणाऱ्या श्रींमंत व्यक्तीला ताब्यात न घेता त्याची कोणतीही चौकशी न करता कसे काय सोडले...? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतीरिक्त सुरक्षा व्यवस्था आहे. असं असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई त्या घुसखोर कार मालकावर केली नाही. मुंबई पोलिसांच्या य दूहेरी न्यायामुळे सर्वत्र आच्छर्य व्यक्तं केलं जातंय. याच ठिकाणी एखाद्या सर्वसामान्य नागरिकाची कार असती तर मुंबई पोलिसांनी अशीच भूमीका निभावली असती का...? मुंबई पोलिसांच्या या निश्क्रीयतेमुळे त्यांच्या जबाबदारीवर अनेक प्रश्नं चिन्हं निर्माण झालेत.