मुंबई : मुंबईत आज मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांचा धडाका लावला आहे.  कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उदघाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. आजपासून या उड्डाण पुलावरील एक मार्गिका मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली.  त्यामुळे मध्य मुंबईतील प्रवास आता सुखकर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  या सोबतच मुख्यमंत्र्यांनी वरळी ते शिवडी या उन्नत मार्गाचंही भूमीपूजन केलं. याशिवाय डबेवाल्यांसाठी सायकल ट्रॅक, स्मार्ट पार्किंगची सुविधा अशा विकास कामांचंही भूमीपूजन केलं. कोरनाच्या पार्श्वभूमीवर इ भूमीपूजनाद्वारे या विकासकामांचा श्रीगणेशा करण्यात आला.



तसेच मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम मुंबई यांना जोडणाऱ्या वरळी-शिवडी या उन्नत जोडमार्गाच्या कामाचे भूमिपूजनही केले गेले. तसेच बीकेसीमध्ये एमएमआरडीएने केलेल्या सुविधांचेही लोकार्पण केले जाणार आहे. बीकेसीतील सायकल ट्रॅक आणि स्मार्ट पार्किंग योजनेचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे.